योजनेचे नाव – एकात्मिक फलौत्पादन विकास अभियान
विभाग – कृषी
योजने बद्दल
साल २००५-०६ मध्ये फलोत्पादन क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सुरू केले. या अभियानाचा मुख्य उद्देश देशातील फलोत्पादनाचे उत्पादन दुप्पट करणे आहे. यासाठी गुणवत्तापूर्ण लागवड साहित्य उपलब्ध करून देणे, नवीन फळबागा लागवड करणे, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करणे, सामुहिक शेततळ्यांद्वारे सिंचन क्षमता वाढवणे, हरितगृह आणि शेडनेट हाऊसद्वारे नियंत्रित शेती करणे, एकात्मिक अज्ञद्रव्ये आणि कोड व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, मनुष्यबळ विकास, आणि काढणी व्यवस्थापन यांसारख्या विविध बाबींकरिता आर्थिक मदत केली जात आहे.
गुणवत्तापूर्ण लागवड साहित्य उपलब्ध करून देणे, नवीन फळबागा लागवड करणे, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करणे
उद्देश-
- प्रादेशिक अनुकूलता आणि गरजांच्या आधारे विविध कृषि हवामान विभागांमध्ये फलोद्यान क्षेत्राचा सर्वागीण विकास संशोधन, तंत्रज्ञान, प्रसार, काढणीतील तंत्रज्ञान आणि विपणन सुविधांच्या माध्यमातून समूह पद्धतीने साधणे.
- शेतकऱ्यांना एकत्र करून शेतकऱ्यांच्या गटांची स्थापना करणे आणि शेतकरी उत्पादक समूहांची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
- उत्पादकता आणि उत्पादन वाढवून निव्वळ उत्पादनात सुधारणा करणे.
- शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणे आणि आहारातील पोषणमूल्य वाढवणे.
- विद्यमान फलोत्पादन विषयक विविध योजनांमध्ये समन्वय साधून एकरूपता आणणे.
- पारंपरिक उत्पादन पद्धतींना आधुनिक शास्त्रीय ज्ञानाशी जोडून तंत्रज्ञानाचा विकास, प्रसार आणि प्रचार करणे.
- कुशल आणि अकुशल, विशेषतः बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे.
खाली नमूद केलेल्या घटकांचा लाभ शेतकरी घेऊ शकतात
- उच्च तंत्रज्ञान असलेल्या रोपवाटिकांची स्थापना करणे.
- उतीसंवर्धन प्रयोगशाळेचे बळकटीकरण/पुनरुज्जीकरण.
- नवीन उतीसंवर्धन प्रयोगशाळा स्थापन करणे.
- भाजीपाला विकास कार्यक्रम.
- गुणवत्तापूर्ण लागवड साहित्य आयात करणे.
- भाजीपाला, बियाणे प्रक्रिया, पॅकिंग, साठवण यासाठी पायाभूत सुविधा.
- नवीन बागांची स्थापना करणे.
- फलोत्पादन यांत्रिकीकरण.
- अळिंबी उत्पादन.
- पुष्प उत्पादन.
- मसाला पिकांची लागवड.
- जुन्या फळबागांचे पुनरुज्जीकरण करून उत्पादनात वाढ करणे (आंबा, संत्री, काजू, चिकू, मोसंबी, कागदी लिंबू, पेरू, आवळा).
- नियंत्रित शेती घटक (हरितगृह, शेडनेट हाऊस, पक्षिरोधक जाळी, प्लास्टिक आच्छादन, प्लास्टिक टनेल, पॉलीहाऊसमधील उच्च दर्जाच्या भाजीपाला लागवड व निविष्ठांसाठी अनुदान, पॉलीहाऊसमधील/शेडनेट हाऊस मधील उच्च दर्जाच्या फुलपिकांच्या लागवड व निविष्ठांसाठी अनुदान).
- सेंद्रिय शेती.
- एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन.
- परंपरागीकरणासाठी मधुमक्षिका पालन.
- एकात्मिक काढणीपश्चात व्यवस्थापन (पॅक हाऊस, एकात्मिक पॅक हाऊस, पूर्व शितकरण गृह, शितखोली, फिरते पूर्व शितकरण गृह, शितगृह (नवीन/विस्तारीकरण/आधुनिकीकरण), शितसाखळीमध्ये नवीन तंत्रज्ञान राबविणे आणि आधुनिकीकरण, शितवाहन, प्राथमिक/फिरते प्रक्रिया केंद्र, रायपनींग चेंबर, शेतावरील कमी ऊर्जा वापरणारे थंड साठवणूक गृह, कमी किमतीचे फळ-भाजीपाला साठवण केंद्र, कमी खर्चाचे कांदा साठवणूक गृह/कांदाचाळ (२५ मे. टन), पुसा शून्य ऊर्जा आधारित शितगृह (१०० किलो), एकात्मिक शितसाखळी पुरवठा प्रणाली – या सर्व घटकांचा समावेश असावा).
- फलोत्पादन पिकांसाठी विपणन सुविधा स्थापन करणे (शासकीय/खासगी/सहकारी क्षेत्र).
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सामूहिक शेततळे आणि वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणासाठी अनुदान देणे
पात्रतेचे निकष
- शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्यांकडे ७/१२ प्रमाणपत्र आणि ८-अ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा असल्यास जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- शेतकरी किंवा शेतकरी समूहाकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्याने शेततळे अस्तरीकरणासाठी अधिकृत ५०० मायक्रॉनची प्लास्टिक फिल्म वापरणे अनिवार्य आहे.
- सामूहिक शेततळा हा शेतकरी समूहासाठी आहे, ज्यामध्ये २ किंवा अधिक शेतकरी असावे. शेतकऱ्यांचे संयुक्क कुटुंब नसावे, आणि त्यांच्या ७/१२ खात्यातील जमीन धारणा स्वतंत्र असावी.
- शेततळ्यातील पाणी वापरण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे.
- पूर्वी केलेले शेततळे, नैसर्गिक खड्डे, दगड खाणी, विहिरी इत्यादी ठिकाणी सामूहिक किंवा वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण मंजूर केले जाणार नाही.
- सामूहिक शेततळ्याचा लाभ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, जळगाव, तसेच विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा व कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील सर्व प्रवर्गातील अर्जदार पात्र राहतील.
- सामूहिक शेततळे घटकासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे अर्जदार पात्र राहतील. तथापि, वरील २५ जिल्ह्यांखेरीज इतर जिल्ह्यांमधील सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदारांना सामूहिक शेततळे हा घटक अनुज्ञेय राहणार नाही.
आवश्यक कागदपत्रे
- ७/१२ प्रमाणपत्र
- ८-ए प्रमाणपत्र
- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थीसाठी जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- खरेदी करण्याचे साधन / उपकरणांचे कोटेशन किंवा बिल
अर्ज करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/RegistrationLogin/RegistrationLogin