१. समूह शेती (Group farming) – संकल्पना, गरज आणि फायदे
चालू शतकात शेती हे उदरनिर्वाहाचे साधन राहिलेले नसून ते उत्पन्न निर्मितीचे साधन झाले आहे. साहजिकच शेतीमध्ये व्यवसायिकता येण्यास सुरुवात झाली असून शेतकरी वर्ग आता शेती ला एक व्यवसाय म्हणून पाहतो आहे. शेती पिकाच्या उत्पादनासाठी येणारा खर्च कमी ठेऊन आणि त्यातून मिळणाऱ्या नफयाचे प्रमाण जास्तीत जास्त असावे, असा एक कल सुरू झाला आहे. थोडक्यात काय नुसतेच शेतमालाचे उत्पादन न वाढविता ते विकून नफा वाढविण्याकडे शेतकयाने जास्त लक्ष दिले पाहिजे, यावर भर दिला जात आहे.
याकरीता उत्पादन वाढीच्या प्रयत्नांबरोबरच ही उत्पादने ज्या समुदायाला विकायची आहेत, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना अपेक्षीत असलेल्या गुणवत्तेचा किंवा प्रक्रिया केलेला माल विकणे व त्यातून जास्तीचा नफा कमाविणे, याला महत्व प्राप्त झाले आहे. म्हणजेच उदरनिर्वाहाच्या शेतीचे रुपांतर व्यवसायीक शेतीमध्ये झाले आहे.
व्यवसायीक शेती संकल्पना
व्यवसायीक शेती ही संकल्पना पुढे घेऊन जाण्यासाठी आजच्या शेती पध्दतीतील उणीवा व त्यातून पुढे येणाया सध्या यावर विचार करून शेती पध्दतीत बदल करणे आवश्यक आहे. आजच्या शेती पध्दतीतील उणीवा अनेक सांगता येतील. यामध्ये शेतकयांचे सरासरी दरडोई जमिनीचे प्रमाण, शेतकयांचा शेतमाल उत्पादनासाठी दयावा लागणारा वेळ व त्यामुळे शेतमाल विक्रीसाठी त्याच्याकडे नसलेला वेळ, शेतमालावर प्राथमिक व दुय्यम प्रक्रियेसाठी उपलब्ध नसलेल्या सोईसुविधा, शेतमाल साठवणूकीसाठी अपूया सुविधा, शेतमालाचे वहन करण्यासाठी अपुरी साधने, हे सर्व करण्यासाठी भांडवलाचा अभाव, भांडवल उभे करण्यासाठी वैयक्तिक स्तरावर वित्तीय संस्थांशी जोड देण्यात येणाया अडचणी इ. अशा अनेक गोष्टी समोर येतात. या सर्व गोष्टींवर उपाययोजना शोधणे वैयक्तिक स्तरावर फार जिकरीचे काम आहे. यासाठी शेतकयांची गटामध्ये बांधणी करून यातील काही प्रश्न कमी करता येणे शक्य आहे. तसेच या सर्व गटांना शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून एकत्र करून वरील बहुतांश प्रश्न सोडविणे शक्य आहे. यासाठीच समुह शेती व पुढे शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतमाल प्रक्रिया व विक्री या स्वरूपाचा प्रमुख पर्याय पुढे येतो.
समूह शेती म्हणजे काय?
- समूह शेतीत शेतकरी हा केंद्रस्थानी असून क्लस्टर / अथवा गावातील एक समान पीक घेणाया अथवा समान उद्देश असणाया उत्पादकांनी एकत्र येऊन पिकांचा उत्पादन खर्च कमी करणे आणि शेतमालास वाजवी भाव मिळविणे या तत्वावर काम करणे अभिप्रेत आहे. समुह शेती ही शेती व्यवसाय किफायतशीर बनविण्यासाठीचे एक चांगले माध्यम आहे.
- आज शेतकयाचा पिक उत्पादनासाठी प्रती हेक्टरी होणारा खर्च हा कमी करण्यासाठी, पिकाची उत्पादकता वाढवून एकूण उत्पादन वाढविण्यासाठी, शेतमाल पुरवठा साखळीतील मध्यस्थांची संख्या कमी करण्यासाठी आणि शेतमालाच्या थेट विक्रिस चालना देण्यासाठी समूह शेतीचा उपयोग होऊ शकतो.
- समूह शेती करताना सहभागी उत्पादकांना एकत्रित कृषी निविष्ठा (खते, औषधे, बि-बियाणे इ.) खरेदी व त्याचे परिसरातील शेतकयांना वाटप, शेती संसाधनाचा सामूहिक अथवा भाडेतत्वावर वापर, उत्पादीत शेतमालावर प्राथमिक प्रक्रिया करून सामूहिक विक्री, शेतमालाची थेट विक्री यासारख्या बाबींची अंमलबजावणी करता येईल. यामुळे त्यांना उत्पादन खर्च कमी होण्याबरोबरच शेतमालास वाजवी भाव मिळविणे शक्य होईल व परिणामी शेतकऱ्याच्या निव्वळ नफयात वाढ होईल.
समुह शेतीचे फायदे
- एकत्रित कृषी निविष्टा खरेदीमुळे गुणवत्ता पूर्ण निविष्ठाची (बियाणे, औषधे, खते इ.) विहित कालावधीत स्थानिक पातळीवर उपलब्धता व त्यामुळे निविष्ठांच्या खरेदी खर्चात बचत.
- पेरणी ते काढणी पर्यंत आवश्यक औजारांची / यंत्रसामुग्रीची स्थानिक पातळीवर उपलब्धता करता येईल.
- पिक संरक्षणाची सामुहिक पातळीवर व्यवस्था करता येईल.
- माती परिक्षण व सल्ला सेवा सुरू करता येईल.
- भाजीपाला रोपवाटीका तयार करून सभासद शेतकयांना रोपे पूरविता येतील.
- मागणी आधारीत शेतमालाचा पुरवठा या तत्वाचा प्रभावीपणे अंमलबजावणी करता येईल.
- उत्पादकता वाढविणेसाठी ज्ञानाची देवाण घेवाण प्रभावीपणे करता येईल.
- पिकाच्या काढणी पश्चातील कामे प्रभावीपणे करता येतील व त्यासाठी आवश्यक सुविधांची / सेवांची उपलब्धता करता येईल.
- बाजारपेठेची अद्यावत माहिती कमी वेळेत उत्पादकापर्यंत सर्वांपर्यत पोहचविता येईल.
- शेतमालाच्या विक्री खर्चात बचत करता येईल.
- शेतमालास ग्राहक देत असलेल्या पैशातील शेतकयाच्या भागात वाढ करता येईल.
- स्पर्धाक्षम बाजारपेठेचा शोध व शेतमालास वाजवी भाव मिळविता येईल.
- क्लस्टरपातळीवर कृषी व्यवसायाची उभारणी करता येईल.
- पाण्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करता येईल तसेच शेतीत सुक्ष्म सिंचनाच्या आधुनिक सुविधांचा मोठया प्रमाणात अवलंब करता येईल.
- शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येईल.
२. शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना कशी केली जाते?
शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय?
शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी समान उद्दिष्टयांच्या पूर्ततेसाठी व आर्थिक लाभासाठी एकत्र येऊन सन २०१३ कंपनी कायदयाअंतर्गत निर्माण केलेली एक ऐच्छिक संघटना होय.
शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना प्रक्रिया
- शेतकरी कंपनीची नोदणी ही कंपनी सेक्रेटरी मार्फत कंपनी ऑफ रजिस्ट्रार (ROC) यांच्याकडे केली जाते.
- शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणीसाठी किमान १० प्रवर्तक असावेत यापैकी किमान ५ प्रवर्तकांना संचालक करावे. संचालकांची संख्या किमान ५ ते १५ इतक्या मर्यादेत असावे.
- कंपनी नोंदणी करतेवेळी संचालकांचे KYC कागदपत्रे, तहसीलदार/तालुका कृषी अधिकारी यांच्या सही व शिक्क्याचा शेतकरी असल्याचा दाखला व ७/१२ उतारा संचालकाच्या नावे असणे आवश्यक आहे.
- जर एखाद्या इच्छुक सदस्याच्या नावे जमीन नसल्यास त्याच्याच घरातील जमीन धारक (उदा. वडील, पती, सासरे, सासूबाई इ.) यांचे ना हरकत प्रमाणपत्र सोबत जोडावा.
- कंपनी सेक्रेटरी कडे प्रस्तावित कंपनीचे कमीत कमी ५-६ नावे प्राधान्यक्रमाने सुचविणे गरजेचे असतात.
- आपण ज्या कंपनी सेक्रेटरी (CA/CS) कडे आपल्या कंपनी नोंदणी चे काम सोपवणार आहात त्यांचे मार्गदर्शन घेऊन आपण समोर जाऊ शकता.
३. उत्पादक कंपनीच्या निर्मितीतील महत्वाचे टप्पे
कंपनी प्रर्वतन (Promotion)
- शेतकरी उत्पादक कंपनीच्या निर्मीतीतील हा पहिला टप्पा असून सर्वसाधारणपणे या टप्प्यात क्लस्टरमधील उत्पादकांनी वर नमूद केल्यानुसार आपल्या
- क्लस्टर मधून किमान १५ ते २० उत्पादक गटांची निर्मिती करावी
- जर आपल्या क्लस्टर मध्ये पूर्वी पासून तयार झालेले उत्पादक गट असतील व ते निष्क्रिय असतील तर त्यांना पुनर्जीवित करून त्यांचा समावेश करता येईल जेणेकरून वेळेची बचत होईल.
- गटातील सदस्यांना उत्पादक कंपनीची संकल्पना व फायदे याबाबत माहिती देणे गरजेचे असते.
उत्पादक गटाच्या सदस्यांची सभा
सभे मध्ये कोणते महत्वाचे विषय असले पाहिजेत?
- आयोजित केलेल्या सभेच्या अध्यक्षाची निवड
- आयोजित केलेल्या सभेच्या अध्यक्षाची निवड
- उत्पादक कंपनीची स्थापना
- उत्पादक कंपनीचे नाव निश्चित करणे(किमान ६ नावे)
- उत्पादक कंपनीचे अधिकृत भांडवल ठरविणे (किमान ५ लाख)
- संचालकाची निवड (कमीम कमी ५ जास्तीत जास्त १५)
- कंपनीचा तात्पुरते कार्यालय ठरविणे
- कंपनी सेक्रेटरीने सर्वप्रथम प्रवर्तक/संचालकांची आवश्यक माहिती विहित नमुन्यात संकलीत करावी तसेच आवश्यक कागदपत्रे जमा झाल्याची खातरजमा करावी.
- ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कंपनी सेक्रेटरीने निवडलेल्या संचालकाच्या डिजीटल सहया प्राप्त करून घ्याव्यात व तदनंतर प्रत्येक संचालकाचा संचालक ओळख क्रमांक काढावा (DIN).
- कंपनी सेक्रेटरीने उत्पादक कंपनीला नाव प्राप्त करून घेण्याच्या अनुषंगाने विहित नमुन्यातील ई फॅार्म भरून इतर आवश्यक माहीतीसह कंपनी ऑफ रजिस्टर्स (आर.ओ.सी.) ला फाईल करावा.
- आर.ओ.सी. कार्यालय सादर केलेला अर्ज व आवश्यक दस्तावेज / कागदपत्रे यांची तपासणी करून उत्पादक कंपनीस नाव दिले जाते .
कंपनी नोंदणी
- कंपनीस नाव प्राप्त झाल्यावर कंपनी सेक्रेटरीने प्रवर्तक / संचालकाच्या सहकार्याने नियोजीत कंपनीचे घटनापत्र, नियमावली अधिकृत भाग-भांडवल, शेअर्सची रक्कम, संचालकांची यादी आणि त्यांची लेखी संमतीचे पत्र, कंपनीचा नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता इत्यादी बाबतचे आवश्यक दस्तावेज तयार करावेत.
- हे काम झाल्यावर कंपनी सेक्रेटरीने कंपनी नोंदणीचा विहित नमुन्यातील ई फॉर्म भरावा व तो पूर्वी तयार केलेल्या दस्तावेजासहित आणि नोंदणीसाठी अपेक्षीत शुल्कासहीत आर.ओ.सी. ला सादर करावा.
- आर.ओ. सी. कार्यालयातील नोंदणी अधिकारी कंपनी सेक्रेटरीने सादर केलेला ई फॉर्म, नोंदणी शुल्क व आवश्यक दस्तावेज / कागदपत्रे हे कायदेशीररित्या बरोबर असल्याची खात्री करतात आणि त्यानंतर उत्पादक कंपनीस कंपनी कायदा २०१३ अंतर्गत नोंदणी झाल्याचे प्रमाणपत्र देतात.
- कंपनी कायदा – २०१३ नुसार नोंदणी झालेल्या प्रत्येक उत्पादक कंपनीच्या व्यवस्थापनावर आणि सभासदांवर (या दोन्हीवर) कंपनीचे घटनापत्रक आणि नियमावली ही बंधनकारक असतात व त्यातील सर्व अटी/तरतूद त्यांना लागू होतात.
नमुना – कंपनी नोंदणी प्रमाणपत्र
Faucibus auctor mauris nisi consectetuer, eget viverra nec arcu, libero consectetuer mollis velit mi phasellus, quisque velit. Laoreet orci porta…
Delivered ye sportsmen zealously arranging frankness estimable as. Nay any article enabled musical shyness yet sixteen yet blushes. Entire its…
Delivered ye sportsmen zealously arranging frankness estimable as. Nay any article enabled musical shyness yet sixteen yet blushes. Entire its…
Delivered ye sportsmen zealously arranging frankness estimable as. Nay any article enabled musical shyness yet sixteen yet blushes. Entire its…
Good information